सोलापूर : उजनी धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. मुख्य कालव्यातून सकाळी दीड हजार तर दुपारपासून त्यामध्ये वाढ करत तीन हजार 200 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
सिंचनासाठी पाणी सोडावे, अशी शेतकर्यांची मागणी नसतानाही पाणी सोडल्यामुळे पाटबंधारे विभागामध्ये नियोजनाचा अभाव दिसत आहे. नियोजनाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.