इंदापूर – उजनी धरण गुरुवारी सकाळीच 100 टक्के भरले आहे. उजनी धरणात 101.56 टक्के एवढा पाणीसाठा झाल्याने सोलापूर जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली आहे. गेला आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे 100 टक्क्यांच्या आसपास भरली असल्याने या धरणांमधून नदी तसेच कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.
दि.25 ऑगस्टला अवघा 67 टक्के साठा असलेल्या धरणात अवघ्या पाचच दिवसांत 34 टक्क्यांनी वाढ होत पाणी पातळीने शंभरी ओलांडली. दरम्यान धरण 100 टक्के भरले असले तरी आगामी काळात पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. नाहीतर उन्हाळ्यात नागरिकांवर पाणीपाणी करण्याची वेळ येऊ नये म्हणजे झालं!