बोदवड : तालुक्यातील जुनोना शिवारातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणार्या फरकांडा मारुती मंदिराचे पुजारी व अन् एक जण जखमी झालयाची घटना उजनी-बोदवड रस्त्यावर शुक्रवारी दुपारी दिड वाजता घडली. फरकांडा मारुती मंदिराचे पुजारी भरतसिंग शामशिंग पाटील (65) व त्यांच्या दुचाकीवर मागे बसलेले पंढरी दयाराम पाटील (4, दोन्ही रा.जुनोना, ता.बोदवड) हे जखमी झाले. पुजारी भरतसिंग पाटील व पंढरी पाटील हे दुचाकी (क्र.एम.एच.28 पी.4712) यावरून बोदवड येथे येत असतांना बोदवडकडून उजनीकडे भरधाव वेगाने येत असलेल्या मारूती स्विफ्ट कार (क्र.एम.एच.04,जी.एम.2704) ने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यात दोन्ही दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना उपचारार्थ जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसात गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले.