उजाड कुसूंबा येथे एकाला मारहाण चौघांविरुद्ध दिली तक्रार

0

जळगाव । मतदान प्रतिनिधीचा अर्ज देण्यासाठी गेल्याचे वाईट वाटून एकाला चौघांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास उजाड कुसूंबा येथे घडली असून याप्रकरणी राधाकिसन भाईदास चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधाकिसन चौधरी हे शिरसोली-चिंचोली गटातील जिल्हा परिषदेच्या उमेदवार धनूबाई वसंत आंबटकर यांचा मतदान प्रतिनिधीचा अर्ज देण्यासाठी
वॉर्ड क्रं. 5 मध्ये गेले होते. त्याचे वाईट वाटून त्यांना बुधवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास बापू प्रकाश पाटील, महेंद्र शिवाजी पाटील, गजानन कौतिक पाटील व विनोद मोतीराम पाटील (रा.कुसंबा) यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, असे यावेळी चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, गावातील हा वाद रात्री एमआयडीसी
पोलीस ठाण्यात पोहचला असता दिडशे ते दोनशे जणांचा जमाव ठाण्याच्या आवारात आला होता. यावेळी ठाणे अंमलदारांनी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचा जमावा दम भरल्यानंतर गर्दी ओसरली.