उज्जैनकर फाऊंडेशनतर्फे घरोघरी जाऊन वृक्षवाटप

0

मुक्ताईनगर। शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनतर्फे तालुक्यातील काकोडा शिवारातील अहिल्याबाई होळकर नगर, खोरी येथे 51 वृक्षांची लागवड करण्यात आली. येथील रहिवाशांनी आपापल्या घरासमोर 2 ते 3 फुटांचे खड्डे खोदले व फाऊंडेशनच्या वतीने प्रत्येक घरासमोर 3 ते 4 वृक्ष लागवडीसाठी देवून स्वतःच रहिवाशांनी वृक्षलागवड केली. तसेच लावलेले वृक्ष जगविण्याची हमी दिली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सुधाकर पाटील, राजू करविले, अंबादास भोलाणकर, बाळू विलावर, संतोष गवळी, अनिता भोलाणकर, सखाराम बगाडे, पुंडलिक करविले, यादव करविले, हरिभाऊ जवरे, राजेंद्र सवडे, गजानन करविले, देवा येडे, शिवाजी करविले यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष एस.एम. उज्जैनकर, उपाध्यक्ष निंबाजी हिवरकर, सचिव प्रमोद पिवटे, सहसचिव राजेंद्र सवडे, शिवाजी गोरले, एस.डी. ठाकुर, सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.