उज्ज्वला योजनेचा लाभ मिळण्यासाठी भिलिस्थान टायगर सेनेतर्फे निवेदन

0

तळोदा। तालुक्यात उज्वला योजनेचा लाभ देण्यात यावा यासाठी आज भिलिस्थान टायगर सेने तर्फे निवेदन देण्यात आले.ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना धुरामुळे होणारा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी उज्ज्वला योजनेची सुरुवात करण्यात येऊन आदिवासी व दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबाला पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस देण्याची अभिनव योजना आहे;

मात्र लोकप्रतिनिधीच्या श्रेयाच्या राजकारणात आणि अधिकारी व गॅस एजन्सींच्या उदासीन धोरणामुळे आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात या योजनेचा बोजवारा उडाला आहे. तळोदा तालुक्यात 67 ग्रामपंचायती असून योजनेचा लाभ दिला गेलेला नाही.तरी त्यांना त्वरित लाभ द्यावा अन्यथा भिलिस्थान टायगर सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन तळोदा येथील किरण गैस एजन्सी, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांना सुद्धा दिले आहे. निवेदनावर भिलिस्थान टायगर सेनेचे तालुकाध्यक्ष राजन पाडवी, उपाध्यक्ष देवीसिंग वळवी ,तालुका संघटक सुपड्या पाडवी, मनोज ठाकरे, विनोद माळी, विवेक पाडवी, योगेश पाडवी, वसीम बागवान, चेतन बैरागी, राजेश ठाकरे, गणेश ठाकरे, मालसिंग ठाकरे, विशवनाथ पाडवी,व संजय पाडवी यांच्या सह्या आहेत.