पहूर । येथील तिरूपती भारत गॅस एजन्सीजतर्फे 300 महिलांना मोफत गॅसवाटप करण्यात आले. खा.डॉ.विकास महात्मे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, पं.स.सभापती संगीता पिठोडे यांच्याहस्ते वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शेवटच्या घटकापर्यंत गॅस संच दिले जाणार असल्याचे खा.डॉ. विकास महात्मे यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, माजी पं.स.सभापती बाबुराव घोंगडे, धनगर समाज संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख रामेश्वर पाटील, साहेबराव देशमुख, बाबुराव पाटील, लक्ष्मण गोरे, यशवंत पाटील, अरूण घोलप, संचालिका नीता रामेश्वर पाटील आदी उपस्थित होते.