उज्वला योजना अंतर्गत बोगस गॅस कनेक्शन वाटप

0

प्रकरणाची कसून चौकशी करण्याची भाजपाची मागणी
चोपडा । तालुक्यात उज्वला योजने अंतर्गत बोगस गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले असून या प्रकराची कसून चौकशी करण्याची मागणी तहसीलदारांकडे भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आली आहे. तालुक्यात दलालांमार्फत उज्वला योजने अंतर्गत दलालांकडून लाभार्थी हडकून बाराशे ते पंधराशे रुपयात गॅस कनेक्शन मिळत असल्याचे भासवून फसवणूक केली जात आहे.या प्रकाराची कसून चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी तहसीलदार दिपक गिरासे यांच्याकडे केली आहे. निवेदनावर पुरवठा दक्षता समिती सदस्य नितीन माळी, तिलकचंद शहा, रिखबचंद जैन यांच्यासह वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.