फुले-शाहु-आंबेडकर विचारमंचाचा उपक्रम
देहूरोड : केंद्र सरकारच्या उज्वला प्लस योजनेंर्गत येथील अर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना मोफत घरगुती गॅसजोड व शेगड्यांचे वितरण करण्यात आले. येथील वृंदावन चौकात शाहु-फुले-आंबेकडर विचारमंचच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देहूरोड परिसरातील गरजू व गरीब महिलांना घरगुती गॅस जोड मोफत योजना पंतप्रधानांमार्फत राबविण्यात येते. या योजनेबाबत ग्रामीण भागात मोठ्या जनजागृतीची गरज आहे. सर्वसामन्यांपर्यंत जीथे या योजनेच्या माहितीचा अभाव आहे.
तिथे दुर्गम भागात व शहरी झोपडपट्ट्यांपर्यंत ही योजना पोहचणे दुरापास्तच होते. येथील फुले-शाहु-आंबेडकर विचारमंचच्या कार्यकर्त्यांनी याबाबत माहिती घेऊन अशा गरीब व गरजु महिलांना काळेवाडी येथील अदिती गॅस एजन्सीच्या माध्यमातून या योजनेंर्गत गॅस जोड मिळवून दिले. सुमारे 25 प्रकरणे मंजुर झाली असून या सर्वांना रविवारी येथील वृंदावन चौकात गॅस जोडाचे वितरण करण्यात आले. यावेळी मंचाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, अदिती गॅसचे व्यवस्थापक सुरेश सुतार, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भोंडवे, भीमराव कुंभार, जयकिशन भुंबक, जगदीश कनौतिया, फुलकुमार चंडालिया, अजय बखारिया आदी प्रमुख पदाधिकार्यांसह मोठ्या प्रमाणात नागरिक व लाभार्थी महिला उपस्थित होत्या.