सांगली : बहुचर्चित अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी अनिकेतच्या कुटुंबीयांना ही माहिती दिली. दरम्यान, अनिकेतच्या हत्या प्रकरणी आणखी एका पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष कांबळे यांचे निलंबन करण्यात आले. अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या कामात हलगर्जी केल्याप्रकरणी कांबळेंना निलंबित करण्यात आले.