उटखेड्यात घरफोडी : लाखाची रोकड चोरट्यांनी लांबवली

रावेर : तालुक्यातील उटखेडा येथे बंद घर फोडून एक लाख रुपये भामट्याने लांबवले. ही घटना रविवारी रात्री घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली. याबाबत रावेर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घर बंद असल्याची चोरट्याने साधली संधी
उटखेडा येथील प्लॉट भागातील रहिवासी मीनाबाई राजू तडवी या वाघझिरा येथे त्यांच्या खाजगी कामानिमित्त गेल्या असता बंद घर असल्याची संधी चोरट्याने साधली. रविवारी रात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा लोखंडी टॉमी सारख्या वस्तुने तोडला व घरात प्रवेश केल्यावर चोरट्याने पत्रीपेटीमध्ये ठेवलेले एक लाख रुपये व तीन हजार रुपये किंमतीच्या सहा भार चांदीच्या पाटल्या मिळून एक लाख तीन हजारांचा ऐवज लांबवला. याबाबत मीनाबाई तडवी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात भादंवि कलम 457 व 380 प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फौजदार सचिन नवले व सहकारी पुढील तपास करीत आहे.