उटखेड्यात लोकवर्गणीतून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

रावेर : तालुक्यातील उटखेडा लोकवर्गणीतुन जमा करण्यात आलेले धान्य व किराणा सामानाच्या किटचे वाटप प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते गरजूंना वाटप करण्यात आले.

गरजूंना मिळाला मदतीचा हात
गावातील गरजू लोकांना ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन धान्य व किराणा देण्याचा निर्णय घेतल्यावर त्यास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 556 किलो गहू, तांदूळ व डाळ जमा झाली तर जमा झालेल्या 14 हजार 840 रुपयांच्या देणगीतून जीवनावश्यक वस्तूंचे किट करण्यात येउन मंगळवारी गावातील 32 गरजूंना वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच सविता गाढे, उपसरपंच अफशान तडवी, सदस्य चेतन पाटील, आशा पाटील, तलाठी हेमांगी वाघ, ग्रामसेवक अतुल पाटील, ललित चौधरी, संजय गाढे, ग्रामपंचायत कर्मचारी गोटू चौधरी उपस्थित होते. गावातील एकूण 45 गरजूंना ही मदत देण्यात आली.