पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली माहिती
मुंबई । शेतकर्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी उडीद आणि मुगाची खरेदी शासन हमीभावाने करणार असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. राज्यात या वर्षी उडीद व मुगाचे चांगले उत्पन्न झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांना रास्त भाव मिळणे गरजेचे आहे. उडीद व मूग खरेदी केंद्रे सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, शेतकर्यांनी कमी दारात उडीद आणि मूग बाजारात विक्री करण्याची घाई करू नये, खरेदी केंद्रे सुरु होईपर्रंत वाट पहावी.
शेतकर्यांना तातडीने पैशांची गरज आहे
शासन त्यांना हमीभाव मिळवून देईल, असे श्री. देशमुख यांनी सांगितले. ज्या शेतकर्यांना तातडीने पैशांची गरज आहे अशा शेतकर्यांनी हमी भावापेक्षा कमी दरात शेतमाल विक्री न करता शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेंतर्गत शासन शेतकर्यांना ६ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देईल. शेतकर्रांचे आर्थिक नुकसान होऊन नये म्हणून राज्यभर लवकरच खरेदी केंद्रे उभारली जातील. या केंद्रांवर हमी भावाने शेतकर्रांचे उडीद व मूग खरेदी केले जातील. एखादा व्यापारी कमी दरात शेतकर्रांचा माल खरेदी करत असेल, तर ती बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. शासन अशा व्यापार्यांवर ठोस कारवाई करेल. आपला माल कमी दरात न विकता योग्य दरात विकावा, असे आवाहनही देशमुख यांनी शेतकर्यांना केले.