मुंबई : राज्यात उडीद आणि मुगाचा दर हमी भावापेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी उडीद आणि मुगाची खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भात केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पणन महासंघ आणि नाफेड यांनी खरेदी केंद्र सुरु करण्याची सर्व तयारी करावी त्यासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन दि. 3ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांनी नोंदणी सुरु करावी, असे आदेश पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.
शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करताना सातबाराची प्रत, आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स सोबत घेऊन जाऊन जवळच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. ही नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना हमी भावाने खरेदी केंद्र सुरु झाल्यानंतर कोणत्या दिवशी उडीद, मुग खरेदी केंद्रावर आणावी याची माहिती नोंदणी केलेल्या खरेदी केंद्रांवरुन कळविण्यात येईल.