उड्डाणपूल उभारण्यासाठी संरक्षण विभागाबरोबर सामंजस्य करार

0

पुणे । घोरपडी येथील पुणे-सोलापूर तसेच पुणे-मिरज रेल्वे मार्गावर उड्डाणपूल उभारण्यासाठी संरक्षण विभागाबरोबर सामंजस्य करार करण्यास पालिकेच्या सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिली आहे.

या दोन्ही मार्गांवरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र, त्याचबरोबर या रेल्वे गेटवरून जाणार्‍या वाहनांची संख्या मोठी असल्याने या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. वाहतूकीची ही कोंडी फोडण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव लष्कराकडून त्यास मान्यता दिली जात नव्हती. हा पूल व्हावा, यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींनी वारंवार केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. अखेर मागील वर्षी तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण विभागाची जागा देण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार, जागा देण्याच्या मोबदल्यात संरक्षण विभागाने काही अटी प्रस्तावित केल्या होत्या. त्यानुसार, या कामास मान्यता देण्यात आली आहे. लष्कराची काही जागा महापालिकेला उड्डाणपुलासाठी देण्याच्या मोबदल्यात संरक्षण विभागाने काही अटी प्रस्तावित केल्या होत्या.