चाळीसगाव । घरफोडीसह शहरातील अंबुजा फॅक्टरीमध्ये झालेल्या चोराचा तपास करुन मुद्देमालसह आरोपींना अटक करणार्या चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील व डीबीचे हवालदार शशिकांत पाटील, पो.कॉ. बापुराव पाटील, राहुल पाटील, नितीन पाटील, गोपाल भोई या 5 कर्मचार्यांचा जळगाव पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवुन जळगाव येथे नुकताचा सत्कार करण्यात आला.
चाळीसगाव येथील मालेगाव रोडवरील जनसेवा मेडीकलमधून उज्वल ऑटो पार्ट्स व गुरुकृपा ऑटो पार्ट्स व भडगाव, कजगाव येथील जवळपास 16 घरफोड्यामधील 7800 रुपयांपैकी 3500 रुपये रोख व 2000 रुपयांचा मोबाईलसह आरोपी विवेक उर्फ विक्की शिवाजी महालेक (22, रा.सुतार गल्ली बहाळ रथाचे ता.चाळीसगाव) यास शहर पो.नि. रामेश्वर गाडे पाटील व डीबीचे हवालदार शशीकांत पाटील, पो.कॉ.बापुराव पाटील, राहुल पाटील यांनी तपास करुन अटक केली होती.तर दुसरा गुन्हा 7 व 8 सप्टेंबर 2017 रोजीच्या रात्री 2.30 ते 5 वाजेदरम्यान व त्यापूर्वी चाळीसगाव येथील अंबुजा फॅक्टरीत झाल्यानंतर आरोपींनी 8 लाख 3 हजार 968 रुपयांचा विवीध कंपनीचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी असलेले इलेक्ट्रीक पॅनलमध्ये असलेले पॉवर कांटेक्टर व एमपीसीबी असे साहित्य चोरुन नेले होते.
बारकाईने लक्ष ठेवून कारवाई
याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पो.नि.रामेश्वर गाडे पाटील व शशिकांत पाटील, बापुराव पाटील, राहुल पाटील, नितीन पाटील, गोपाल भोई यांनी लावुन आरोपी जितेंद्र रामसिंग राजपुत (35), अनिलकुमार समरजीत निषाद (32), शशिकुमार समरजित निषाद (23), अक्षयबरलाला रामला निषाद (20) सर्व रा.ईलाहाबाद यांना 8 सप्टेंबर रोजी अटक केली होती. या गुन्ह्यातील रोहीत गजराजसिंग, प्रकाश ब्रिजराजसिंग, श्रीधर रामगोपाल निषाद, रामधनी मुकेश निषाद हे अद्याप फरार असुन त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. वरील घरफोड्या व चोरीचा तपास लावुन आरोपींना मुद्देमालसह अटक केल्याबद्दल जळगाव पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पो.नि. रामेश्वर गाडे पाटील व डी.बी.चे शशिकांत पाटील, पो.कॉ. बापुराव पाटील, राहुल पाटील, नितीन पाटील, गोपाल भोई यांचा जळगावात सत्कार केला.