यावल : तालुक्यातील किनगाव येथील ग्राम सुरक्षा दलाने शेतमालाच्या चोरीचा प्रकार हाणून पाडला होता शिवाय मध्यरात्रीनंतर गस्ती दरम्यान त्यांना अज्ञात चोरटे दिसताच पाठलागही करण्यात आला मात्र चोरटे पसार झाले. ग्राम सुरक्षा दलाच्या या कामगिरीमुळे नुकतेच यावल पोलिस ठाण्याचे प्रभारी व प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधीक्षक आशीत कांबळे यांनी त्यांचा सत्कार केला.
सतर्कतेची पोलिसांनी घेतली दखल
किनगावात ग्राम सुरक्षा दलातील तरुण गस्त घालत असताना त्यांना काही संशयास्पद लोक दिसले. ते शेतमाल चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने दलातील सदस्य रवी कोळी, संदीप पाटील, राहुल पाटील व सुरेश साळुंखे यांनी आवाज दिला. तेव्हा त्यांनी सदस्यांना पाहून पळ काढला. याबाबत सचिन नायदे यांना माहिती दिली. मात्र ग्राम सुरक्षा दल सदस्यांच्या या कामगिरीबद्दल नुकताच सत्कार झाला. सरपंच निर्मला पाटील, उमाकांत पाटील, पोलिस पाटील रेखा नायदे, संजय पाटील, उपसरपंच लुकमान तडवी, टीकाराम चौधरी, पोलिस पाटील दिलीप साळुंके, आनंदा महाजन, सफदर तडवी उपस्थित होते.