उत्कृष्ट कार्याबद्दल भुसावळ पीओएचला दोन लाखांचा पुरस्कार

0

ग्रीन कंपनीकडून वर्कशॉपला गोल्ड रेटींग ; कर्मचार्‍यांमध्ये आनंद

भुसावळ- विद्युत इंजिन कारखान्याच्या (पीओएच) निरीक्षणासाठी आलेले महाप्रबंधक देवेंद्रकुमार शर्मा यांनी कारखान्यातील विविध बाबींची नुकतीच पाहणी करून समाधान व्यक्त केली. उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांनी विद्युत इंजिन कारखान्याला दोन लाखांचा पुरस्कार जाहीर करून कारखान्याचे मुख्य कारखाना निरीक्षक शिव राम यांना त्याबाबतचे प्रमाणपत्रही दिले तर ग्रीन कंपनीने या कारखन्याला गोल्ड रेटींगही जाहीर केल्याने कर्मचार्‍यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे.

गोल्ड रेटींगमुळे समाधान
विद्युत इंजिन कारखान्याच्या इमारतीत तसेच परीसरात विविध आमुलाग्र बदल करण्यात आले असून पर्यावरण संवर्धनावर अधिक भर देण्यात आल्याने 28 रोजी भुसावळ दौर्‍यावर आलेल्या जी.एम.देवेंद्र कुमार शर्मा यांनी समाधान व्यक्त केले. प्रवेशद्वारांना असलेला डिस्प्ले तसेच रेल्वे सुरक्षा बलाच्या अत्याधूनिक कक्षातून सीसीटीव्हींचे होणारे नियंत्रण यासह लोको इंजिनात बसवलेली वातानुकूलित यंत्रणा तसेच कचरा विघटन प्रकल्पात रबर तसेच कॉटन कचर्‍याच्या विघटनाबाबत शर्मा यांनी समाधान व्यक्त केले. भुसावळ विभागाच्या एकूणच कामकाजाबद्दल शर्मा यांनी समाधान व्यक्त करीत डीआरएम आर.के.यादव यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांवर कौतुकाचा वर्षाव केला. याप्रसंगी विद्युत इंजिन कारखान्याला दोन लाखांचा रोख पुरस्कारही त्यांनी जाहीर केला.0