डीआरएम आर.के.यादव यांनी रोख रकमेसह प्रमाणपत्र देवून गौरवले ; नोव्हेंबर महिन्यात चार कोटी 57 लाखांची दंड वसुली
भुसावळ- विना तिकीट प्रवासासह रेल्वे नियमांचा भंग करणार्या प्रवाशांविरुद्ध धडक कारवाई करून दिवाळीनोव्हेंबर महिन्यात चार कोटी 57 लाख रुपये दंडापोटी उत्पन्न मिळवून देणार्या भुसावळ विभागातील 37 तिकीट निरीक्षकांचा सोमवारी डीआरएम आर.के.यादव यांनी विशेष सत्कार केला. याप्रसंगी वरीष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार आदींची उपस्थिती होती.
रेल्वेला चार कोटी 57 लाखांचे उत्पन्न
दिवाळीच्या काळात रेल्वेला सर्वाधिक गर्दी असते व या गर्दीचा फायदा घेवून काही प्रवासी विनातिकीट रेल्वे प्रवास करतात. अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश रेल्वेच्या वाणिज्य विभागाने दिले होते. भुसावळ विभागातून याबाबत मोहिम उघडल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात चार कोटी 57 लाखांचे दंड वसुली करून रेल्वेला उत्पन्न मिळाल्याने 37 तिकीट निरीक्षकांना सोमवारी डीआरएम आर.के.यादव यांनी रोख बक्षीस व प्रमाणपत्र देवून गौरवले. सत्कारार्थींमध्ये प्रधान तिकीट परीक्षक बी.पी.सिंह, विनय ओझा, आर.के.गुप्ता, एम.एम.शिंदे , मेहबूब जंगलू, पियुष कुमार, ए.के.मिश्रा, अमित शर्मा, राजपाल सिंह, एस.एन.खान, पी.एच.पाटील, जे.के.शर्मा, बी.बी.शिंदे, एम.पी.नजाकर, एस.जे.श्रीवास्तव, शेख अल्ताफ, एस.एस.साव, आर.के.केसरी, मो.रफिक लाडजी, मुन्ना कुमार श्रीवास्तव, ए.एम.खान, पी.एम.पाटील, रमाशंकर, मो.अबीदुल्ला, रंजना संसारे, अरुणकुमार मिश्रा, शेख जावेद, अनिल खर्चे, रंजित शर्मा, मंगेश पाठक तसेच मुख्य तिकीट निरीक्षक एस.के.दुबे, एस.एम.पुराणिक, एस.पी.मालपुरे, ए.के.गुप्ता, टी.बी.नुनसे व वरीष्ठ तिकीट परीक्षक हिरालाल राम, तिकीट परीक्षक निसार खान यांचा समावेश आहे.