भुसावळ । येथील संस्कृती फाऊंडेशनतर्फे जागतिक चिमणी दिनानिमित्त प्लॉस्टिकच्या टाकाऊ बाटल्यांचे जलपात्र बनवून झाडांवर बसविण्यात आले. तसेच ‘मायेचे घरटे’ या उपक्रमांतर्गत ‘घरटे बनवा बक्षीस मिळवा’ या स्पर्धेचा पारितोषिक समारंभ पार पडला. यात एकूण 87 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी बनविलेले घरटे शामा प्रसाद मुखर्जी उद्यानातील झाडांवर बसविण्यात आले आहे.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी तहसिलदार मिनाक्षी राठोड होत्या. उद्घाटन संजयसिंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्रसिंग किसनावत होते. ‘घरटे बनवा बक्षीस मिळवा’ या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरटे बनवून सादर केली. यात उत्कृष्ठ घरटे बनविणार्या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
विजयी झालेल्यांची नावे
यात प्रथम क्रमांक मोहित गायकवाड, यज्ञिका सुरवाडे, अभिजीत झांबरे, गजानन पाटील, द्वितीय- तेजस गांधेले, गोपाळ फापडी यांचा सत्कार झाला. यानंतर नागरिकांना 100 जलपात्रे वाटप करण्यात आली. यशस्वीतेसाठी रणजितसिंग राजपुत, रितेश बोंडे, मनोहर झांबरे, जितेंद्र पवार, योगेश कोलते, चेतन खरारे, धिरज झोपे, क्रितेश दमाडे, अजय पाटील, शुभम अहिररे, हिमानी निकम, सतिष दांडगे, विनोद जाधव, अशोक चौधरी, रोहन परदेशी यांनी परिश्रम घेतले.