भुसावळ। जळगाव येथे झालेल्या कौशल्य विकास दिनानिमित्त संत गाडगेबाबा औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे संधाता निर्देशक संजयसिंग राजपूत यांचा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास प्रादेशिक पातळीवर झालेल्या परीक्षेत संजयसिंग राजपूत हे जिल्ह्यातील उत्कृष्ट संधाता निर्देशक ठरले.
यांचा करण्यात आला सत्कार
त्याचा संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने प्राचार्य संजय शुक्ला व समस्त सहकारी शिक्षक कर्मचारी यांचाकडून सत्कार करण्यात आला त्याच प्रमाणे विजतंत्री निर्देशक पी.जी. कुलकर्णी, कातारी निर्देशक जे. जी. बावने यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.