उत्कृष्ट सेवेची दखल : पालकमंत्र्यांच्या हस्ते फैजपूर पोलिस उपअधीक्षकांसह 12 कर्मचार्यांच्या पोलिस महासंचालक पदकाने सन्मान
भुसावळ : पोलिस दलात गुणवत्तापूर्वक सेवा करणार्या आणि विशेष कार्य केलेल्या पोलिस अधिकार्यांसह कर्मचार्यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले होते. रविवार, 1 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. फैजपूर पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील सात हवालदार व चार नाईक यांना पदक लावून सन्मान प्रसंगी करण्यात आला.
यांना मिळाले पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह
फैजपूर पोलिस अधीक्षक डॉ.कुणाल शंकर सोनवणे, जळगाव मुख्यालयातील संतोष सुरवाडे, जळगाव वाहतूक शाखेच्या महिला हवालदार मेघना जोशी, महामार्ग सुरक्षा पथकाचे शांताराम काळे, जळगाव एटीसीचे रवींद्र भगवान पाटील, भुसावळ बाजारपेठचे नंदकिशोर सोनवणे, भुसावळ पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील संदीप चव्हाण, चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे हेमंत शिरसाठ, जळगाव मुख्यालयाचे रवींद्र वंजारी, जळगाव एटीसीचे प्रवीण पाटील यांना पोलिस महासंचालकांचे चिन्ह जाहीर झाले आहे.