उत्कृष्ट तपासासाठी गृहमंत्री पदक जाहीर; महाराष्ट्रातील १० पोलीस

0

नवी दिल्ली: गुन्हांचा शोध जलद गतीने करणाऱ्या पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सन्मान केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे गृहमंत्री पदक देऊन करण्यात येत असतो. यावर्षीचे गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे. देशातील १२१ पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. आज बुधवारी १२ रोजी घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केले आहे. विशेषबाब म्हणजे यात महाराष्ट्रातील १० पोलिसांचा समावेश आहे.

२०१८ मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली आहे. पोलिसांचे मनोधैर्य वाढविणे आणि गुन्हेगारी क्षेत्रातील तपासाला गती देणे हे आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/PIB%20Delhi/HM’S%20MEDAL%20FOR%20INVESTIGATION,%202020%20-%20LIST%20OF%20AWARDEES.pdf

यात सीबीआयचे १५, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील १०, उत्तर प्रदेशचे ८, केरळ आणि पश्चिम बंगालचे प्रत्येकी ७, राज्य आणि केंद्र शासन प्रदेशातील पोलिसांचाही यात समावेश आहे. २१ महिला पोलीस अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे.