पुणे : ‘ झुलवा ‘ कार लेखक उत्तम बंडू तुपे यांच्यापुढील आर्थिक विवंचना, वैद्यकीय मदतीची गरज लक्षात घेऊन पुण्यातील मातंग समाजाने मदतीचा हात पुढे करून एक लाख रुपयांचा निधी शनिवारी त्यांना सुपूर्द केला.
हे देखील वाचा
झुलवा, भस्म, आंदण, शेवंती, काट्यावरची पोरं, लांबलेल्या सावल्या, पिंड, माती आणि माणसं अशा विविध साहित्यामुळे प्रसिध्द असलेले उत्तम बंडू तुपे आर्थिक विवंचनेत सापडले, दुर्लक्षित झाले. तुपे आणि त्यांच्या पत्नी दोघेही पक्षघातामुळे अंथरुणाला खिळून आहेत. त्यांची ही अवस्था प्रसारमाध्यमातून जनतेसमोर आल्यावर मातंग समाजातील प्रमुखांनी एक लाख रुपयांचा निधी तुपे यांना सुपूर्द केला. पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, नगरसेवक सुभाष जगताप, हनुमंत साठे, सुखदेव अडागळे, विशाल लोखंडे यावेळी उपस्थित होते.