उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी आदित्यनाथ

0

लखनौऊ- अखेर देशाच्या सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे आज स्पष्ट झाले आहे. भाजपच्या 312 नवनिर्वाचित आमदारांची लखनौमधल्या ‘लोकभवन’मधली बैठक झाली . आमदारांची ही बैठक भाजपचे ज्येष्ठ नेते वैकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीतच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची निवड झाली.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी मनोज सिन्हा, केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांची नावे चर्चेत होती. त्यापैकी मनोज सिन्हांचे पारडें जड मानलें जात होते. पण योगी आदित्यनाथ यांचे नाव अचानकपणे पुन्हा चर्चेत आले. योगी आदित्यनाथ, केशव प्रसाद मौर्य, भूपेंद्र यादव, ओम माथुर, आणि सुनील बन्सल या भाजप नेत्यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीआधी वेगळी बैठक घेतल्याचं वृत्त एएनआय ने दिलें होती. योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा जहाल हिंदुत्त्ववादी अशी आहे.