उत्तराखंडमध्ये अडकलेले 195 भाविक सुखरुप

0

जळगाव । उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ येथे वर्षापुर्वी महापूर आल्याने मोठी हानी झाली होती. ही घटना अद्यापही ताजी आहे. मागील काही दिवसांपासून उत्तराखंडला जाणार्‍यांची संख्या कमी होत होती मात्र आता सर्व सुरळीत झाल्यासने यात्रेकरुंची संख्या वाढत आहे. दरम्यान जळगाव शहरासह जिल्ह्यातुन बद्रीनाथ यात्रेला 195 भाविक गेले आहे. दरड कोसळल्याने तेथील मार्ग बंद झाल्याची घटना घडली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील भाविक सुखरुप असल्याचा दावा उत्तराखंड प्रशासन करीत आहे. जळगाव जिल्हा प्रशासन व आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्र्याशी चर्चा केली असता रस्ता पुर्ववत करण्यात आला असल्याची माहिती दिली.

मदतीची मागणी
बद्रीनाथ यात्रेकरुंमध्ये 26 पुरुष, 35 महिलांचा समावेश आहे. जोशीपेठ, मेहरुण, रामेश्‍वर कॉलनी, चिंचोली, एरंडोल, भुसावळ, यावल येथील भाविकांचा यात समावेश आहे. यात मेहरुण कॉलनीतील भाविकांची संख्या अधिक आहे. बद्रीनाथ येथे अडकलेल्या भाविकांची लष्कराचे जवान, अधिकारी मदत करीत आहे. असे असले तरी मंदिराकडे जाणारे मार्ग लवकर मोकळे करुन भाविकांची सुटका करावी अशी मागणी अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यात्रेकरु सुखरुप असले तरी त्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.