देशातील प्रमुख पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हळूहळू यायला सुरुवात झाली आहे. पाच बदल चार राज्यांवर हे भारतीय जनता पक्षाचे सर्व पक्षांना वरचढ ठरत आहे. उत्तर प्रदेश मध्ये भारतीय जनता पक्षाने इतर सर्व पक्षांना अक्षरशः मातीत गडायचा प्रयत्न केला आहे. तर उत्तराखंडमध्ये देखील स्थिती काही वेगळी नसून उत्तराखंडात भाजपची भगवी लाट आली आहे.
उत्तराखंडमध्ये एकूण 70 जागांपैकी भाजपा 40 तर काँग्रेस फक्त 17 जागांवर आघाडीवर आहे. यामुळे उत्तराखंडमध्ये पुन्हा भगवी लाट येणार यात कोणताही वाद नाही. याच बरोबर गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंड काँग्रेस होईल हा काँग्रेसचा दावा या निकालामुळे उधळून गेला आहे.