उत्तराखंड स्थानिक निवडणुकीत भाजप आघाडीवर; १२ ठिकाणी भाजपचे महापौर विजयी

0

डेहराडून-उत्तराखंडमध्ये झालेल्या नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागणे सुरु आहे. मतमोजणी सुरु आहे. ८४ शहराच्या निकालापैकी १२ ठिकाणी भाजपचे महापौर निवडून आले आहे तर ५ ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहे. कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसला ३ जागा मिळाल्या आहे.

आतापर्यंत १०६४ पैकी १५४ जागेवर अपक्ष तर ५५ जागेवर भाजपने विजय मिळविले आहे. काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. कॉंग्रेसने २९ जागा जिंकल्या आहेत.