प्योंगयांग | उत्तर कोरियाने त्यांची अण्विक क्षेपणास्त्रे 4000 किलोमीटरपर्यंत मारा करू शकतात, असा दावा केला आहे. क्षेपणास्त्र चाचण्यानंतर कोणत्याही हल्ला झाल्यास आपल्याकडे अमेरिकेला लक्ष्य करणारा हायड्रोजन बॉम्ब ड्रॉप तयार असल्याचे कोरियाने म्हटले आहे. सध्या अमेरिकेतील कोणत्याही शहरावर बॉम्बचा मारा करण्यास सक्षम असल्याचा उत्तर कोरियाने दावा केलाय.
आण्विक चाचणीनंतर, दोन आठवड्यांतच उत्तर कोरियाने आणखी एक क्षेपणास्त्र जपानच्या दिशेकडे डागल्याने सध्या या परिसरात तणावाचे वातावरण आहे. जगाला आता आमच्या युद्धसज्जता व आण्विक परिपूर्ण तंत्रज्ञानाची ओळख पटली आहे, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. आमच्या क्षेपणास्त्राने 770 किलोमीटर उंची गाठली आहे आणि होक्काईच्या समुद्रापर्यंत सुमारे 3,700 किमी अंतरावर आहे, असेही लष्करी प्रवक्त्याने सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांचा खेळ आता समाप्त झाला आहे. मात्र, अमेरिका पुन्हा महासत्ता असल्याचा व ठेकेदार बनून संपूर्ण जग बळकट करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा केविलवाणा देखावा करीत आहे. आम्ही आधीच गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी आणि प्रारंभिक सहमती निर्माण करण्यासाठी आवश्यकतेनुसार चर्चेस तयार असल्याचे कोरियाने म्हटले आहे.
अमेरिकेने यापूर्वी उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमाबद्दल सातत्याने आक्षेप घेतले आहेत. मात्र, उत्तर कोरियावर त्याचा विशेष प्रभाव पडलेला दिसत नाही. दरम्यान, अमेरिकेचे राजदूत निकी हॅले यांनी सांगितले की, कोरियाला आवर घालण्यास कठोर आर्थिक प्रतिबंद प्रभावी नसल्यास लष्करी कारवाई व इतरही अन्य पर्याय खुले आहेत.
सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक
उत्तर कोरियाने जपानमधील सर्वात लांब अंतरावरील क्षेपणास्त्राची चाचणी केल्यानंतर गुरुवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तात्काळ बैठक बोलावली. उत्तर कोरियाला ताबडतोब अशी कृती थांबवण्यास सांगितले गेले. अमेरिका, चीन आणि रशिया कोरियाविरोधात एकत्रित झालेले दिसतात. सदस्य देशांना कोरियावर सक्तीने प्रतिबंध लागू करण्यास सांगण्यात आले आहे.