उत्तर कोरियाच्या सीमेजवळ एक आखीव रेखीव सुंदर शहर सुमारे 60-65 वर्षांपूर्वी वसविले गेले असून, या शहरात कोणीही रहात नाही. असे सांगितले जाते की 1953 साली दक्षिण कोरियातील नागरिकांना आकर्षित करण्यासाठी हे शहर वसविले गेले आहे. येथे पांढर्या निळ्या रंगात रंगविलेल्या शेकडो काँक्रीट इमारती आहेत.
त्यात शाळेपासून रूग्णालयापर्यंत सर्व इमारती आहेत आणि त्याचा परिसर दीड मैलात फैलावलेला आहे. उत्तर कोरियाचे तत्कालीन प्रमुख की जोन डोंग यांनी एका रात्रीत या शहराची उभारणी केल्याचे सांगितले जाते. कोरियन युद्धाच्या वेळी शस्त्रांचे आगार म्हणून या शहराचा उपयोग केला गेला होता. येथील इमारती काँक्रीटच्या असल्या तरी येथील खिडक्यांना काचा नाहीत. येथे वस्ती आहे असा भास व्हावा म्हणून दररोज रात्री येथील दिवे उजळतात. त्यासाठी ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक टायमरची मदत घेतली जाते. अधूनमधून रस्त्यांची देखभाल करणारे मजूर दिसतात. दक्षिण कोरियाने 1980 साली त्याचे प्रभुत्व दाखविण्यासाठी सीमेवर 321 फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारला होता त्याला उत्तर म्हणून उत्तर कोरियाने 525 फट उंचीचा ध्वजस्तंभ या गावात उभारला असून आजही तो जगातील सर्वात उंज ध्वजस्तंभ मानला जातो.