कतार – पर्शियाच्या आखातातील कतार आणि सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील देशांच्या गटांमध्ये सुरू असलेल्या वितुष्टात हजारो किलोमीटर दूर असलेला उत्तर कोरिया अनपेक्षित भूमिका बजावत आहे. कोरिया आखाती देशांमध्ये आण्विक शस्त्रास्त्रांचे व्यवहार करीत असल्याने अमेरिका अस्वस्थ झाली आहे.
उत्तर कोरिया आखातामधील या देशांना अण्वस्त्रे पुरवित असल्याचा संशय आहे. प्योंगयांगचा अणु कार्यक्रम अमेरिकेसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. गेल्या आठवड्यात युएईमधील कंपनी आणि उत्तर कोरिया यांच्यात १० कोटी डॉलरचा अण्वस्त्र व्यवहार झाला. युएईचा शत्रू कतार याच्यावर उत्तर कोरियाशी धोकादयक संबंध असल्याचा आरोप होत आहे. दोन्ही बाजुंच्या आरोपांमध्ये तथ्य आहे. अमिराती कंपनीला उत्तर कोरियाने शस्त्रे विकल्याचा तपशील २०१५ मध्ये युएई सरकारच्या इमेलमधून उघड झाला होता. कतारमध्ये उत्तर कोरियातून हजारो कामगार येतात. सध्या त्यापैकी अनेक कामगार २०२२ मध्ये नियोजित वर्ल्ड कपसाठी सुविधा तयार करण्यासाठी राबत आहेत. ट्रम्प प्रशासन उत्तर कोरिया आणि आखाती देशांमधील आण्विक शस्त्रांची होणाऱ्या देवाणघेवाणीने चिंताग्रस्त झालेले आहे.