उत्तर नेहरूनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन साजरा

0

पिंपरी-चिंचवड : नेहरूनगर येथील उत्तर नेहरूनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा 11 वा वर्धापन दिन कै. बबनराव कापसे विरंगुळा केंद्रात नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी नगरसेवक राहुल भोसले, डॉ. वैशाली घोडेकर, समीर मासूळकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे शहराध्यक्ष प्रभाकर कोळी, कार्याध्यक्ष सूर्यकांत मुथिया, डॉ. इंद्रजित शहा, डी. बी. शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना नगरसेवक राहुल भोसले म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांचा नेहमीच समाजकार्यात सहभाग असतो. ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभवाचा मोठा ठेवा असतो. त्यांचे मार्गदर्शन आपण नेहमी घेतले पाहिजे, असे भोसले यांनी सांगितले. डॉ. वैशाली घोडेकर, सूर्यकांत मुथिया यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्तर नेहरूनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गुंडाप्पा टेकूर, उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, सचिव नारायण कोळमकर, रमेश कानिटकर, पी. बी. कोपनार व पोपट आढाव उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोळमकर यांनी केले.