भुसावळ : भुसावळ विभागातील सर्व स्टेशनमधून उत्तर-पश्चिम रेल्वेसाठी तसेच बर्हाणपूर स्थानकावर जाण्यासाठी आता कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली असून कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरच रेल्वे प्रवाशांना गाडीत प्रवास दिला जाणार आहे शिवाय प्रवाशांनी प्रवासाच्या 72 तास आधी आरटीपीसीआर निगेटीव्ह रीपोर्ट सोबत बाळगावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी तसेच गैरसोय टाळावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.