नाथ फाउंडेशनतर्फे प्रवाशांची लाडवंजारी मंगल कार्यालयात व्यवस्था
जळगाव– लॉकडाउनच्या पार्श्वभूमिनुसार जळगाव येथील पोलिसानी आज एक आयशर गाडी पकडली. या गाडिची तपासणी केली असता त्यात १४० प्रवासी आढळून आले. हे सर्व प्रवासी पुणेहुन उत्तरप्रदेशकडे जात होते. प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या आदेशाने मंडलाधिकारी योगेश नन्नवरे , तलाठी सचिन माळी , रमेश वंजारी यांनी सर्व प्रवाशांची समस्त लाडवांजरी समाज मंगल कार्यालय येथे व्यवस्था केली आहे. माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली नाथ फाउंडेशनतर्फे ६५ नागरिकांना जेवणाची व्यवस्था तसेच बेडसिट , अंघोळीसाठी साबण , कोलगेट , खोबरेल तेल , रुमाल सर्व वस्तू पुरविण्यात आल्या. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवांजरी , सुनिल माळी , दीपक फालक , दिलीप माहेश्वरी , कृष्णा नेमाडे , ईश्वर पाटिल , जमील शेख , अमजद पठान, अयाज शेख यांच्यासह सहकारी उपस्थित होते. नाथ फाऊंडेशनने दिनांक २४ पासून ते आजपर्यंत ६०० नागरिकांना नास्ता , जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली आहे.