मुंबई । उत्तर प्रदेश मोठे राज्य आहे.त्याचे पुर्व उत्तरप्रदेश व पश्चिम उत्तरप्रदेश असे विभाजन करण्यात यावे. अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.ही मागणी तेथील जनतेची आहे. उत्तर प्रदेश विधानसभा प्रदेश निवडणुकीत उत्तरप्रदेश विभाजनाचा मुद्दा हा आरपीआयच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा असेल असे त्यांनी सांगितले.
राजकारणाला कलाटनी मिळण्याची शक्यता
.भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात मोठा वाटा असलेले शहीद क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनावर आधारित ’राष्ट्रपुत्र’ सिनेमाच्या पोस्टर प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. रामदास आठवलेंच्या या वक्तव्यामूळे उत्तरप्रदेशच्या राजकारणाला एक वेगळी कलाटनी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रपुत्र हा सिनेमा नव्या पिढीला देशभक्तिची प्रेरणा देणारा असल्याने तो टॅक्स फ्री करावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देखील ना.रामदास आठवलेंनी यावेळी दिले. अंधेरी पश्चिम येथील पीव्हीआर सिटी मॉल येथे बॉम्बे टॉकीज निर्मित राष्ट्रपुत्र सिनेमाच्या पोस्टर, संगीत आणि ट्रेलरचे उदघाटन ना.रामदास आठवलेंच्या हस्ते झाले.