लखनौ- समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी एकत्र आल्यानंतर कॉंग्रेसने ‘एकला चालो’ची भूमिका घेतली आहे. कॉंग्रेसने त्यादृष्टीने तयारी देखील सुरु केली आहे. दरम्यान फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी १३ रॅली काढणार आहे. रॅलीत मोठ्या संख्येने जनसमुदाय गोळा करण्याची जबाबदारी अन्य राज्याच्या नेत्यांवर सोपविण्यात आली आहे.
मुरादाबाद, आगरा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीमध्ये रोड शो करणार आहे. ७ फेब्रुवारीला मुरादाबाद येथे रॅली होणार आहे.