उत्तर प्रदेशमध्ये भाजपा बहुमताने सरकार स्थापन करेल : अमित शहा

 

कानपूर : भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेशमध्ये दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. यावेळीही उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली योगी आदित्यनाथ दोन तृतीयांश बहुमताने मुख्यमंत्री बनणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्व माफिया एकतर तुरुंगात आहेत, राज्य सोडून गेले आहेत किंवा समाजवादी पक्षाच्या उमेदवारांच्या यादीत आहेत, असे म्हणत त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.
आम्ही पश्चिम उत्तर प्रदेशला माफियांपासून मुक्त करू, असे सांगितले होते आणि आम्ही सांगितले तेच केले आहे. आज संपूर्ण उत्तर प्रदेशातील एकाही माफियामध्ये काहीही चुकीचे करण्याची हिंमत नाही. माता-भगिनी पूर्णपणे सुरक्षित आहेत. गेल्या पाच वर्षांत भाजपाच्या राजवटीत माफियांचे पलायन झाले आहे. उत्तर प्रदेशातील माफिया आता फक्त तीन ठिकाणी आहेत. राज्याबाहेर, तुरुंगात किंवा अखिलेश यादव यांच्या यादीत आमदार होण्यासाठी उत्सुक. आपले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियांना सरळ करण्याचे काम केले आहे, असे शहा म्हणाले.
============