लखनऊ । उत्तर प्रदेश सरकारने खाजगी गुंतवणुकीच्या माध्यमातून देशातील दोन मोठ्या रेल्वेस्थानकांचा लिलाव करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. लिलावाच्या माध्यमातून या रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार हा लिलाव ऑनलाइन पद्धतीने 28 जून रोजी होईल. या लिलावात उत्तर प्रदेशातील कानपुर जंक्शन आणि अलाहाबाद जंक्शन या रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. इच्छुक कंपन्या रेल्वेच्या संकेतस्थळावर लॉग ऑन करून बोली लावू शकतील. कानपूर जंक्शनची आधारभूत किंमत 200 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे, तर अलाहाबाद रेल्वेस्थानकासाठी 150 कोटी रुपये आधारभूत किंमत ठरवण्यात आली आहे. 28 जून रोजी होणार्या या लिलावाचा निकाल 30 जून रोजी जाहिर करण्यात येईल. या दोन स्थानकानंतर देशातील इतर रेल्वेस्थानकांचाही खासगीकरणाच्या माध्यमातून पुर्नविकास करण्यात येणार आहे. देशातील प्रमुख रेल्वेस्थानकांवर ही योजना राबवण्यात येणार आहे.
मुंबई, ठाणे पुणे ही
देशातील 25 रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे आहे. त्यात महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, मुंबई सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनस, बारीवली आणि पुणे रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. याशिवाय देशातील विशाखापट्टणम्, हावडा, कामाख्य, फरिदाबाद, जम्मू तावी, बंगळुरू छावणी, भोपाळ, बंगळुरू (इंदूर) या रेल्वेस्थानकांसाठीही लवकरच लिलाव प्रक्रिया होणार आहे.
कोट्यवधींची गुंतवणूक
खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून पुर्नविकास करण्यासाठी देशातील प्रमुख रेल्वेस्थानकांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते. सुमारे 30,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून देशातील 25 प्रमुख रेल्वेस्थानकांचे पुनर्निर्माण आणि विकास करण्यात करण्यात येईल. पुनर्विकासाच्या योजनेतून लिलावात रेल्वे स्थानक खरेदी करणार्यास रेल्वेस्थानकामध्ये हॉटेल, मॉल, मल्टिप्लेक्स आणि अन्य व्यावसायिक गाळे बांधण्याची परवानगी देण्यात येणार आहे.