लखनऊ। सहा राज्यांच्या पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी केल्या संयुक्त कारवाईत इसीसशी संबंधीत असलेल्या काही संशयीतांना अटक केली होती. ज्या लोकांना पकडण्यात आले ते सर्व वेगवेगळ्या मदरशांमध्ये शकत होते. त्यामुळेच पोलिसांनी परिसरातील मशीद आणि मदरशांवर करडी नजर ठेवली आहे.
उत्तर प्रदेशमधील बिजनौर आणि परिसरातील 2 हजार मशीद आणि मदरशांवर सुरक्षा दलांची करडी नजर असल्याचे समजते. उत्तर प्रदेशमधून पाच युवकांना दहशतवादी कट रचल्याप्रकरणी ताब्यात घेतल्यापासून या सर्व मशीद आणि मदरशांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. या पाचही युवकांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी यातील चार जणांची चौकशी करून शुक्रवारी (दि.21) सोडले असून यातील एक जण अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे. अटकेत असलेल्या संशयीताचे नाव मोहम्मद फैजान आहे. तो एका मशिदीत इमाम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांना पकडण्यात आले ते सर्व वेगवेगळ्या मदरशांमध्ये शकत होते. त्यामुळेच पोलिसांनी परिसरातील मशीद आणि मदरशांवर करडी नजर ठेवली आहे.