लखनौ: उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. हत्यासत्र थांबत नाहीये. सामान्य नागरिक नाही तर तीन वेळा आमदार राहिलेल्या निर्वेंद्र मिश्रा यांची हत्या करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. लखीमपूर खीरी विधानसभा मतदार संघातून ते तीन वेळा आमदार राहिलेले आहे. दोन वेळा ते अपक्ष म्हणून निवडून आले होते.
लखीमपूर खीरी येथे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मिश्रा आणि विरोधी गटात जमिनीचा वाद होता. रविवारी दोन्ही गटात जमिनीवरून किरकोळ वाद सुरू झाला. त्यानंतर वाद शिगेला गेल्यानंतर हाणामारी सुरू झाली. यात मिश्रा यांना बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या मिश्रा यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या वादात मिश्रा यांचा मुलगाही जखमी झाला असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिश्रा यांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
पुलिस की उपस्थिति में आज दिनदहाड़े लखीमपुर में तीन बार के विधायक रहे श्री निर्वेन्द्र मुन्ना जी की निर्मम हत्या व उनके पुत्र पर हुए क़ातिलाना हमले से प्रदेश हिल गया है. श्रद्धांजलि!
भाजपा राज में प्रदेश की जनता क़ानून-व्यवस्था के विषय पर चिंतित ही नहीं, भयभीत भी है.
निंदनीय!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) September 6, 2020
या घटनेनंतर योगी सरकारवर टीका होत असून कारवाईची मागणी केली जात आहे. समाजवादी पार्टीचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बहुजन समाजवादी पक्षाच्या नेत्या मायावती यांनी कारवाई कऱण्याची मागमी केली आहे. भाजप सरकारच्या काळात गुन्हेगारी वाढल्याचे आरोप करण्यात आले आहे.
यूपी लखीमपुर खीरी के पूर्व विधायक श्री निर्वेन्द्र कुमार मिश्र उर्फ मुन्ना की निर्मम हत्या व इसी जिले में छात्रा की दुष्कर्म के बाद फन्दा लगाकर की गई हत्या की घटनायें अति-दुःखद व चिन्ताजनक। सरकार दोषियों के खिलाफ ऐसी सख्त कार्रवाई करे जिससे ऐसी दर्दनाक घटनायें प्रदेश में रूकें।
— Mayawati (@Mayawati) September 6, 2020