उत्तर प्रदेशात ७० वर्षांच्या महिलेवर बलात्कार !

0

शाहजहानपूर : विकृत बुद्धी कुठे कशी चालेल सांगू शकत नाही. शाहजहानपूरमध्ये ७० वर्षाच्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. तिच्या नातेवाईकानेच बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

पीडित महिला रामपूरची राहिवासी आहे. धाकिया रानवास गावातील सिधौलि पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. २८ सप्टेंबर रोजी तिच्यावर नातेवाईकानेच बलात्कार केल्याचे पोलीस अधिकारी बिरजा राम यांनी सांगितले. आरोपी हरियाणातील राहिवासी असून त्याचा शोध चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.