उत्तर प्रदेश झाकी है : महाराष्ट्र आभी बाकी है
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे ढोल-ताशांच्या गजरात चार राज्यांचा विजयोत्सव
जळगाव –
देशातील पाच राज्यात नुकत्याच निवडणुका झाल्या या पाच राज्यातील निकाल गुरुवारी लागला. यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, पंजाब या पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये जनतेने पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टी वर विश्वास ठेवून प्रचंड बहुमताने निवडून दिले. याचा चार राज्यातील विजयाचा आनंद उत्सव आज जिल्हा भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथे दुपारी गुलाल,रग उधळून, फटाके फोडून ढोल ताशा च्या गजरात पेढे वाटप करून जल्लोषात विजय उत्सव साजरा केला व उत्तर प्रदेश झाकी है : महाराष्ट्र आभी बाकी है या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
य फटाक्यांची लड फोडून ,पेढे वाटप करून, ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळून,महिला नी फुगड्या खेळून जय श्री रामाचा घोष करून विजयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. या विजय उत्सवा नंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने भव्य मोटरसायकल रॅली आयोजन करण्यात आले होते. या मोटर सायकल रॅलीची सुरुवात पक्षाचा ध्वज दाखवून जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे व युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.
बाईक रॅली
युवामोर्चा ची भव्य मोटर सायकल रॅली भाजपा कार्यालय येथून सुरू होऊन शहरातील घाणेकर चौक, टाॅवर/ चित्रा/कोर्ट/नेहरू चौक, मनपा, टाॅवर चौक मार्गे भाजपा कार्यालय येथे समारोप झाला. तसंच या विजय उत्सवप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, युवा मोर्चा पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, जळगाव ग्रामीण चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिमा पूजन
सर्वप्रथम स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यारपन मा. महापौर सीमा भोळे, गटनेते भगत बालानी, प्रदेशच्या महिला उपाध्यक्षा उज्वला बेंडाळे, महिला अध्यक्ष दिप्ती चिरमाड, नगरसेविका ॲड सुचीता हाडा, दीपमाला काळे, गायत्री राणे ,नगरसेवक धीरज सोनवणे, राजेंद मराठे, महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माल्यार्पण व पूजन करण्यात आले.