जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जळगावात सभा सुरु आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्रातील सिंचनाचा बॅकलॉग आम्ही भरून काढला आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन दिले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचनाचे कामे झाली, अजूनही खूप काही करायचे आहे असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडले. राहुल गांधी कोठे आहे? काही दिसत नाही असे म्हणत कॉंग्रेसला टोला हाणला.