जळगाव : जैन इरिगेशनच्या माध्यमातून भवरलालजी जैन यांनी फक्त खान्देशच नव्हे तर देश आणि विदेशात 100 हून अधिक देशात जलव्यवस्थापनाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार, प्रसार केला आहे. कृषि उद्योग क्षेत्रात जैन इरिगेशनचे भरीव योगदान दिले आहे. त्याचबरोबर देश, विदेशात जलव्यवस्थापनाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार, प्रसार केला आहे. ठिबक सिंचनामुळे अमूल्या पाण्याची बचत करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे गौरोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांना ‘उत्तर महाराष्ट्र रत्नगौरव’ हा पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार त्यांचे बंधू, महाराष्ट्र विपणन प्रमुख अभय जैन यांनी स्वीकारला. किमान 300 वर्षांचा इतिहास असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये काल 21 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार समारंभात हा सन्मान करण्यात आला.