जळगाव । तंत्रज्ञानामध्ये विशेषत: संगणकात होणारे बदल लक्षात घेवून संगणकीय प्रगती साधावी, असे आवाहन दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील अधिष्ठाता प्रा.रमेशकुमार अग्रवाल यांनी केले.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेच्या वतीने आज शुक्रवार, 24 मार्च पासून अॅडव्हान्सेस् इन कॉम्प्युटिंग (एनसीएसी-2017) या राष्ट्रीय कार्यशाळेला प्रारंभ झाला. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्रा.अग्रवाल बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यावेळी मंचावर प्रशाळेचे संचालक डॉ.बी.व्ही.पवार, समन्वयक प्रा.सतिष कोल्हे, प्रा.स्नेहलता शिरुडे उपस्थित होते.