जळगाव। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे बी.बी. ए.,बी.एम.एस., बी. एम.एस. (ई-कॉमर्स), बी. सी.ए., एम.एम.एस.(कॉम्प्युटर मॅनेजमेंट),एम. एम.एस.(पर्सोनल मॅनेजमेंट), एम.सी.ए (इन्टिग्रेटेड) व एम.बी.ए.(इन्टिग्रेटेड) या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी केंद्रीय प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.
12 जुलै रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवेश परीक्षेचे प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर 30 मे उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 24 जून पर्यत असणार आहे. विद्यापीठाने घोषित केलेल्या अर्ज स्वीकृती केंद्रावर प्रवेश अर्ज 26 जून पर्यंत स्वीकारले जाणार आहे. 5 जुलै पासून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध होणार असल्यचे प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष प्रा. बी.व्ही. पवार यांनी कळविले आहे.