उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विधी प्रशाळा प्रवेश अर्जास सुरुवात

0

जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विधी प्रशाळेतंर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून अंतिम मुदत 25 आहे. विधी प्रशाळेतंर्गत पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटस्, पोस्ट ग्रॅज्यएट डिप्लोमा इन मेडिकल ज्युरीस्प्रुडन्स अ‍ॅण्ड टॉक्सिकोलॉजी, पोस्ट ग्रॅज्यएट डिप्लोमा इन बायो फॉरेन्सिक लॉ अ‍ॅण्ड बायो टेरेरिझम लॉ हे तीन पदव्युत्तर- पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. कोणतेही पदवीधर विद्यार्थी पात्र आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 25 जुलौ ही अंतिम तारीख आहे. विद्यापीठाच्या ुुु.र्पाी.रल.ळप या संकेतस्थळावर माहितीपत्रक देण्यात आले आहे. 28 जुलै रोजी गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रकाशित केली जाणार आहे. 31 जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल, अशी माहिती प्रशाळचे प्रभारी संचालक डॉ.एस.आर.भादलीकर यांनी दिली.