मुक्ताईनगरात नायब तहसीलदारांची अरेरावीनंतर आंदोलक संतप्त
मुक्ताईनगर :- तहसील कार्यालयात उत्पन्नाचे दाखले मिळत नसल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी ठिय्या आंदोलन केले. गेल्या 15 दिवसापासून तलाठी संघटनेचे कामबंद आंदोलन असल्याने नागरीक व विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखले मिळत नसल्याने अनेक कामे रेंगाळली आहे तर त्याचा उद्रेक म्हणून शनिवारी शिवसेनेने विचारणा केली असता निवासी नायब तहसीलदार नीलेश पाटील यांनी अरेरावीची भाषा केल्याने पदाधिकारी संतप्त झाले. तहसील प्रशासनाने मागील काळात अवैद्य वाळू उपसा करणार्या बोटी महसूल प्रशासनाने जप्त केल्या मात्र अद्यापर्यंत फौजदारी अथवा दंडात्मक कारवाई न झाल्याने महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धत्तीबाबत शंका उपस्थित करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख छोटू भोई, अफसर खान, बाळा भालशंकर, सुनील पाटील, प्रवीण चौधरी, राजेंद्र हिवराळे, राजेंद्र तळेले, विठ्ठल तळेले, सचिन पाटील, भैय्या श्रीखंडे, धीरज जावरे, अविनाश अडकमोल, मनोज भोई, शुभम शर्मा, दिलीप पाटी, संतोष कोळी, गणेश पंडित, भूषण वानखेडे, हरी माळी, किरण कोळी, पप्पू मराठे, साबीर पटेल, नरेंद्र गावंडेसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
दोषींवर गुन्हा दाखल करा
गेल्या काही दिवसांपासून तलाठी कामबंद आंदोलन करीत असून नागरिकांची दाखल्यासाठी होणारी गैरसोय थांबवून पर्यायी व्यवस्था करावी व अवैद्य वाळू उपसा करणार्या मक्तेदारास व जप्त केलेल्या बोटी व त्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.