धाडीत सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
नंदुरबार। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नंदुरबार जिल्ह्यात दि,6 मे रोजी ठिक ठिकाणी धाड टाकून बेकायदेशीर दारू विक्री व वाहतूक करणार्या लोकांवर धडक कारवाई केली,या कारवाईत सुमारे 1लाख,22 हजार,890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, या प्रकरणी सात गुन्हे दाखल करण्यात आले असून 7 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध मद्यसम्राटांना भरली धडकी
नंदूरबार जिल्ह्यात बेकायदेशीर दारू विक्री व वाहतूक करणार्या मद्य साम्राटांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी वक्रदृष्टी टाकून कारवाई करण्याचा धडाका लावला आहे, त्यात भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक मनोज संबोधी या दबंग अधिकार्यांनी दुर्गम भागातील मोठं मोठे बेकायदेशीर दारू अड्डे उध्वस्त करून दारू सम्राटांना चपराक दिली आहे, त्यामुळे दबंग अधिकार्यांच्या नावाची धडकी भरल्याने खळबळ उडाली आहे, अशीच एक कारवाई दि,6 मे रोजी या पथकाने केली आहे, ठीक ठिकाणी टाकलेल्या धाडीत देशी,विदेशी, मद्य साठा तसेच वाहन जप्त करण्यात आले आहे, या कारवाईत सुमारे 1 लाख,22 हजार,890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, या प्रकरणी वेगवेगळे 7 गुन्हे दाखल करण्यात आली असून 7 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यात नरेंद्र भानुदास चौधरी रा,खापर,मुकेश पोपट चौधरी, अक्कलकुवा, भगवान ठाणसिंग गिरासे,सारंगखेडा, दिलीप भगवान पाटील तोरखेडा,आबा पांडू पाटील अनरद,मुकेश धनराज माळी सोनवद, सुक्रम हुपड्या वळवी बीजगाव,यांचा समावेश आहे, ही कारवाई सीमा तपासणी नाक्याचे निरीक्षक अनुपकुमार देशमाने,भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक मनोज संबोधी,मोहन पवार, जवान राहुल साळवे,तुषार सोनवणे, धनराज पाटील,हंसराज चौधरी, अजय रायते,नितीन ठणके,या पथकाने केली आहे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सुरू केलेल्या या कारवाई च्या विशेष मोहिमेमुळे मद्य साम्राटांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
Next Post