नवापूर। आगामी गणेशोत्सव व बकरी ईद हे सण नागरीकांनी गूण्या गोविंद्याने साजरे करून कायद्याचा आदर करावा, नवापूर तालूक्याचा इतिहास पहाता येथील नागरीक नेहमीच प्रशासनाला सहकार्य करीत असून नवापूर शहर हे जिल्ह्यातील एक आदर्श असल्याचे प्रतीपादन उपविभागीय अधिकारी निमा आरोरा यांनी केले. प्रशासकीय विभाग आपणास माहिती व सहकार्य करत नसेल तर त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी केले.
कायदा हातात घेणार्यांवर कारवाई केली जाईल तशी वेळ येऊ देऊ नका असेही आरोरा यांनी सांगीतले. या बैठकीत अध्यक्षस्थानी पोलीस उप अधिक्षक रमेश पवार, जिप अध्यक्षा रजनी नाईक, भरत गावित, तहसीलदार प्रमोद वसावे यांची उपस्थिती होती. पोलीस उपअधिक्षक रमेश पवार प्रास्तविक पो.नि.विजयसिंग राजपूत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गोपळ पवार यांनी तर आभार पो उप निरिक्षक दिपक पाटील यांनी मानलेत.